ट्रॅक्टर च्या चाकाखाली चिरडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू

Foto
औरंगाबाद: अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे समोरील चाक गेल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास जुना भावसिंगपुरा  भागातील वीटभट्टी वर घडली. छावणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.चेतन अनिल मोरे वय-3 वर्ष असे  मृत चिमुकल्याचे नाव आहे.

आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आई घरातील काम करीत होती.तर वडील अंघोळ करीत असताना तीन वर्षीय चेतन घरासमोरील अंगणात खेळत होता. त्या ठिकाणी वीटभट्टी वर आलेला एक ट्रॅक्टर उभा होता. चालक मुनिर खान इमाम खान वय-35 वर्ष (गल्ली क्रमांक-6,किराडपुरा) हा बाजूलाच मित्रासह बोलत उभा होता. काही वेळाने चालक मुनिर हा स्टेअरिंगवर बसला व मित्र ही शेजारी बसला दोघांच्या गप्पा रंगल्या.  तेवढ्यातच ट्रॅक्टरच्या मुंडक्याचे समोरील चाक चिमुकल्या चेतनच्या अंगावरून गेले. तर त्यामागील  मोठे चाक डोक्यावरून गेल्याने चेतन चा जागीच मृत्यू झाला .  चालक आणि मित्र दोघे बोलयांत एवढे मग्न होते  की आपल्या  वाहनाखाली एक चिमुकला ठार झाला याची कल्पनाही त्यांना न्हवती.आई-वडिलांनी हंबरडा फोडल्या नंतर काही अंतरावर गेलेल्या चालकाला माहिती झाले की चाकाखाली चिमुरडा चिरडला गेला आहे. आई वडील व भट्टीवरिली इतर  कामगारांनी चेतनला घाटी रुग्णालयात हलविले.  मात्र काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.या प्रकरणी  छावणी पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पोलिसांनी चालक मुनिर ला ताब्यात घेऊन ट्रॅकटर जप्त केले आहे.

सहा महिन्या नंतर आज जाणार होते मूळगावी
भुसावळ जवळील गंगापुरी या गावातील रहिवाशी असलेला मोरे कुटुंबातील 8 ते10 जण रोजगारा साठी औरंगाबाद येथील भावसिंगपुरा येथे वीटभट्टी वर नोव्हेम्बर महिन्यात आले होते. सहा महिने परगावी काम करून आलेले पैशे घेऊन घरी जाणार असल्याचा आनंद सर्व मोरे कुटुंबियांच्या चेहऱ्यावर होता.आज सकाळी दहा वाजता सर्व जण मूळगावी गंगापुरी येथे जाणार होते.त्यासाठी सकाळ पासूनच वीटभट्टी वर  तयारी सुरू होती.मात्र  गावी जाण्याच्या दोन तासा अगोदरच चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आणि आनंदाच वातावरण  दुःखात बदलले.

मायेचा हात फिरविला अन तो शेवचा ठरला..!
चेतन बाहेर खेळत असताना मस्ती करीत होता. काम करणाऱ्या आईने त्यास खोडसाळपणा नको करू असे म्हणत गालगुच्च घेतला आणि आपण आता लावकर घरी जाऊ तू सतावू नकोस मला काम करू दे असे म्हणत मायेचा हात डोक्यावरून फिरवला मात्र तो शेवटचा ठरला.